कल्याण : नवी मुंबई परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या होप मिरर फाउंडेशनच्या वतीने पत्रकारितेतील कार्याबद्दल युवा पत्रकार कुणाल म्हात्रे यांना गोल्डन प्रेस्टीज अवॉर्ड 2021 या पुरस्काराने अंधेरी येथील दिमाखदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते अरुण बक्षी, सिनेअभिनेत्री आरती नागपाल, होप मिरर फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान शेख यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
होप मिरर फाउंडेशनने गुरुवारी पहिला गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार आणि पहिला गोल्डन प्रेस्टीज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, एसीपी सुनील बोंडे आणि चंद्रकांत मते हे पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला एकता मंचने पाठिंबा दिला. वर्सोवा, अंधेरी येथे झालेल्या कार्यक्रमात संपुर्ण भारतातील पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सागर उत्वल, शाहनवाज शेख, डॉ नूरी परी, मनीष गुप्ता, सुमन ऑस्कर, अरुणा नाभ, सदफ शेख, सिंधू नायर, स्वामी अभिनंदगिरी महाराज, स्वप्नील शिरसाठ आणि सुंदरी ठाकूर यांना चांगल्या कार्यासाठी कौतुकाचे प्रतिक म्हणून गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार देण्यात आला. तर समाजकल्याण क्षेत्र सुप्रसिद्ध कलाकार, गायक आणि विनोदी कलाकारांना त्यांच्या उद्योगातील उत्कृष्टतेसाठी गोल्डन प्रेस्टीज पुरस्कार प्राप्त झाला. मीनाक्षी दीक्षित, केट शर्मा, निकिता रावल, व्हीआयपी, गायक दिलीप सेन, संदिप सोपरकर, आरती नागपाल, पंकज बेरी, शर्लिन चोप्रा, शिव्या पठाणिया, पायल घोष, नायरा बॅनर्जी, वेरोनिका वनीज आणि अरुण बक्षी, पत्रकार कुणाल म्हात्रे, मिलिंद जाधव यांना गोल्डन प्रेस्टीजियस पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.
होप मिरर फाउंडेशन ही नवी मुंबई स्थित सामाजिक संस्था आहे. जी लॉकडाऊन, मार्च २०२० पासून वंचितांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक रमजान शेख यांनी कृतज्ञता व्यक्त करताना “सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांचे कौतुक करणे हा हेतू होता. त्यांचे कल्याण करा आणि त्यांचा सन्मान करा या उद्देशाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्याचे रमजान शेख यांनी सांगितले.