Dombivli :आपणा सर्वांना सांगताना अत्यानंद होत आहे की आपला समाज हा असा समाज आहे ज्या समाजाने शिवरायांच्या बरोबर राहून स्वराज्य लढाईत मोलाचे कार्य केले,अगदी पेशवे काळात सर्वाधिक वेतन आगरी ह्यांना होते,अगदी डोंबिवली च्या इतिहासात आन ठाकूर मान ठाकूर असे अनेक आगरी हुतात्मे झाले परंतु आपल्या समाजाचा इतिहास हा मौखिक राहिला,त्यांना शब्दबद्ध करून इतिहास लिखित स्वरूपात लिहिला गेलाच नाही. आपण जन्माला आल्यानंतर समाजाचे देणे लागतो ह्या भूमिकेतून सतत समाजाबद्दल विचार करतांना काय करता येईल ह्या भावनेने आपला इतिहास लिखित स्वरूपात अगदी चिकित्सक पद्धतीने शब्दरूप होणे गरजेचे होते.आणि हा सर्व विचारकल्लोळ उंबार्ली गावचे प्राध्यापक *श्री.सुरेश मढवी सर* ह्यांच्या मनात होतेत्यांनी आपल्या समाबद्दल सखोल अभ्यास केला आणि *ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक इतिहास* हा विषय घेऊन *PHD* केली आहे,आणि *डॉक्टर श्री सुरेश मढवी सर(उंबार्ली)* ह्यांनी खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक अंगाला न्याय देऊन आगरी समाजाचा इतिहास लिहिला गेला, उंबार्ली गावाचे नाव ह्या निमित्ताने चारही सागरी जिल्ह्यांमध्ये ह्याबनिमित्ताने अधोरेखीत झालेले आहे.
Dr.Suresh Madhavi Sir