भिवंडी शहरातील सिल्क मिल्स लूम कारखान्यात अब्दुल मन्सूरी या तरुणाचा हवा पोटात भरण्यात आल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत.
कारखान्यात थट्टा मस्करी सुरू असतानाच घडला प्रकारअब्दुल हा भिवंडीतील खाडीपार भागातील एका चाळीत राहत होता. त्याच भागात असलेल्या सिल्क मिल्स लूम कारखान्यात लूम कामगार म्हणून कार्यरत होता. तर दोन्ही आरोपीही याच लूम कारखान्यात ( Loom labor death in Bhivandis loom factory ) लूम कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यातच २६ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजल्याच्या सुमारास अब्दुल व आरोपींची कारखान्यात थट्टा सुरू होती. त्यातूनच दोघा आरोपींनी कारखान्यात असलेल्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनचा पाईप अब्दुलच्या गुदव्दारात घुसविला. त्यानंतर मशीन सुरू केली. त्यावेळी गुदव्दारावाटे हवा प्रेशरने पोटात जाऊन आतड्याना गंभीर ( death due to Pipe in private part ) दुखापत झाली होती. भिवंडीतील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा १ डिसेंबर २०२१ रोजी मृत्यू झाला. थट्टा करण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू ( labor death while friends kidding in Bhivandi ) झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी-याप्रकरणी मृत तरुणाचा साडू शबोउद्दीन मन्सुरी यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभार करीत आहेत.