डोंबिवली - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अपक्ष माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नावाचे मेसेज समाज माध्यमातून व्हायरल केले जात आहेत. याबाबत कुणाल पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला असून जे मेसेज कोणी मेसेज व्हायरल करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी पोलिसांना केली आहे. जर कारवाई झाली नाहीतर ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावातील दस्तनोंदणी सुरू करण्यासाठी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती.यानंतर विना टोकण दस्त नोंदणी सुरु करण्यासाठी कुणाल पाटील यांचा पाठपुरावा चालू होता. मात्र असे असताना विरोधकांकडून कुणाल पाटील यांच्या नावाने समाज माध्यमातून मेसेज व्हायरल केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने पैसे बिल्डरांकडून उकळले असल्याचा आरोप या मेसेज द्वारे करण्यात आला आहे.याबाबत कुणाल पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला असून जे मेसेज कोणी मेसेज व्हायरल करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी पोलिसांना केली आहे आणि जर कारवाई झाली नाहीतर ठाणे पोलीस आयुक्त कार्यालया बाहेर उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.सदर विषयाबाबत पाटील यांनी डोंबिवली मध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे
जे कोणी मेसेज व्हायरल करत आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, कुणाल पाटील यांची मागणी