कल्याण : ओमायक्रॉनच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका ओळखून कल्याण डोंबिवली पालिकेने शनिवारी रात्रीपासून राज्य शासनाने लागू केलेले सर्व नवीन निर्बंध कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रासाठी लागू केले आहेत.रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. पाचहून अधिक रहिवाशांना जमावबंदी काळात एकत्र येता येणार नाही. उपाहारगृहे, हॉटेल्स, चित्रपट, नाटय़गृहे याठिकाणी एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी असेल. बंदिस्त सभागृहात एकावेळी फक्त १०० व्हराडी उपस्थित राहू शकतील. मोकळय़ा मैदानात २५० लोकांना एकावेळी उपस्थित राहण्यास मुभा आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारे सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम १०० जणांच्या उपस्थितीत पार पडतील. जेथे आसनक्षमता नाही, तेथे २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल.