ठाणे : कळवा येथील वाघोबानगर भागात ५० रुपये चोरल्याच्या संशयावरून संदीप प्रजापती (४१) याने त्याच्या १० वर्षीय मुलाची क्रूरपणे सळईने मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करण असे मृत मुलाचे नाव असून कवटी फुटल्याने त्याचा मृत्यू झाला. करणच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह संदीपने चादरीमध्ये गुंडाळून घरातच ठेऊन दिला होता. याप्रकरणी कळवा पोलिसांनी संदीपला अटक केली आहे.
वाघोबानगर येथील ठाकूरपाडा परिसरात संदीप (४१) हा त्याची पत्नी बिमली (३०), मुलगे करण (१०), अर्जुन (२) आणि मुलगी गुड्डी (६) यांच्यासोबत राहतो. गुरुवारी सकाळपासून त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. दुपारी नागरिकांनी याच परिसरात राहणाऱ्या संदीपच्या काकीला बोलावले. त्याच्या काकीने दरवाजा ठोठावल्यानंतर संदीपने आतून आवाज दिला की, करण आजारी आहे. त्यानंतर संदीपची काकी घरी निघून गेल्या. सायंकाळी त्या पुन्हा संदीपच्या घराजवळ आल्या. त्यांनी पुन्हा दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. संदीपच्या काकीने घाबरून नागरिकांना कळविले. सर्व नागरिक त्याच्या घराजवळ जमा होऊन दरवाजा ठोठावू लागले. त्यानंतर संदीपने दरवाजा उघडून आपण करणचा खून केल्याचे नागरिकांना सांगितले. यानंतर तो निघून गेला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी कळवा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आले त्यावेळी पोलिसांनी गुड्डीला विचारले असता, करणने ५० रुपये चोरल्याने वडिलांनी त्याची हत्या केल्याची माहिती तिने दिली. पोलीस पथकाने संदीपचा परिसरात शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली द
गुन्ह्यची पार्श्वभूमी
संदीप हा परिसरात वेल्डर म्हणून काम करतो. बुधवारी रात्री त्याने घरात पैसे ठेवले होते. यातील ५० रुपये करणने चोरल्याचा संशय संदीपला आल्याने त्याने लोखंडी सळईने करणला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याने त्याच्या हाता, पायावर सळईने प्रहार केले. त्यात करणच्या हाता पायाची हाडे तुटली. त्यानंतर संदीपने त्याच्या डोक्यात प्रहार केला. हा प्रहार इतका जोरदार होता की, त्याच्या डोक्याची कवटी फुटली. त्यानंतर त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून घरामध्येच ठेऊन दिला होता. सर्व कुटुंबीय या मृतदेहाजवळच झोपले होते. दुसऱ्या दिवशी त्याची हत्या झाल्याचे समोर आले. अशी माहिती पोलिसांनी दिली.