कल्याणमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई गलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रीतसर तक्रार केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या घटनेचा महानगरपालिका कामगार संघटनेकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक बंदी बाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह पहाटे वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केट मध्ये कारवाई करण्यास गेले. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल व त्यांचे पथकाने धाड घालण्यास सुरुवात केली काही क्षणातच व्यापाऱ्यांनी लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले.
व्यापाऱ्यांची वाढती गर्दी पाहता पथकाने तेथून काढता पाय घेतला. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचे सहायक आयुक्त सुधीर मोकल यांनी सांगितलं. या घटनेनंतर महानगरपालिका कामगार संघटनेने निषेध नोंदवला आहे. एपीएमसीमध्ये कारवाई हे आमचे काम नाही यासाठी एपीएमसी ने स्वतंत्र पथक नेमले पाहिजे आज हा हल्ला झालाय या घटनेचा महानगरपालिका कामगार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला असून मारहाण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.