ठाणे : मुरबाड तालुक्यातील बळेगाव केंद्राची जि.प.शाळा आंबेळे खुयेथे शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी शिक्षण परिषद केंद्रप्रमुख श्री. सजंय धनगर यांच्याअध्यक्षतेखाली जि.प.शाळा आंबेळे खु येथे पार पडली. शिक्षण परिषदेसकेंद्रातील सर्व शिक्षक - शिक्षिका उपस्थित होते.या कार्यक्रमवेळी जि. प. शाळा सायले येथील सहशिक्षक श्री. नवनाथ जरेयांनी नियोजीत उपक्रमानुसार वाचन प्रकल्प कार्यक्रमाविषयी, त्यानंतर शंभरदिवसाच्या वाचन प्रकल्पाविषयी विस्तृत चर्चा झाली.जि .प .शाळा इंदे येथील शिक्षक श्री. भरत सुरोशे यांनी उमंगअभियानांतर्गत भाषा विषयाची वाचन तयारी कशी करावी या बद्दल माहिती दिली.त्यानंतर मुरबाड पं.स.येथील श्रीम.तारमळे मॅडम यांनी वाचन प्रकल्प व आधारकार्ड संकलन याविषयी माहिती दिली. यावेळी मुरबाड येथील दिव्यांग समावेशितविशेष शिक्षिका श्रीम. पतंगराव मॅडम यांनी दिव्यांगत्वाच्या एकवीसप्रकारांची मुद्देनिहाय माहिती दिली.आदर्श शिक्षक श्री. पांडुरंग भोईर यांनी प्रात्यक्षिकासह सोपे मनोरंजकविज्ञान विषयक प्रयोग सादर केले. टाकाऊपासून विज्ञानाच्या प्रयोगासाठीउपयुक्त साहित्य बनवणे, वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांमध्येवैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता निर्माण करणे, हवेचा दाब, ध्वनी,वारंवारिता ,गुरुत्वाकर्षण शक्ती अशा अनेक गोष्टींचा वेगवेगळ्या घटकांवरहोणारा परिणाम सोपे करुन सांगितले. या शिक्षक परिषदेत विद्यार्थ्यांनासुध्दा प्रयोगातून आगळ्यावेगळ्या शैलीने उपस्थित विद्यार्थी निष्कर्ष वतत्वे अनुभवले.या शिक्षण परिषदेस कार्यक्रमास श्री.दिगंबर वाळकोळी, श्री.दिगंबर सुरोशेव इतर आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वात शेवटी जि .प. शाळा आंबेळे खु,मुख्याध्यापक श्री. शरद चौधरी यांनी आभार सर्वांचे आभार मानले.