ठाणे : येथील कोलबाड नाका भागात दुकानातील रोकड घरी घेऊन निघालेल्या व्यापाऱ्याच्या मुलावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळी झाडली. चेतन ठक्कर असे जखमीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोलबाड येथे गोिवद ठक्कर यांचे किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा चेतन हा दुकानातील दोन लाख रुपयांची रोकड घेऊन दुचाकीने घरी निघाला होता. चेतन कोलबाड नाका परिसरात आला असता दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्याच्या दिशेने बंदुकीने गोळी झाडली. ही गोळी चेतनच्या पोटात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात नागरिक जमा झाले.