महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारवी गुरुत्व जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत केले जाणार आहे. या २४ तासाच्या कालावधीत ठाणे, डोंबिवली, तळोजा औद्योगिक क्षेत्र, निवासी विभाग, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर पालिका परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या जांभूळ येथील जलशुध्दिकरण केंद्रातून ठाणे, कल्याण, डोंबिवली शहर परिसर, उल्हानगर, डोंबिवली, तळोजा एमआयडीसी विभाग, निवासी विभाग आणि ग्रामपंचायत हद्दीला पाणी पुरवठा केला जातो. या भागाचा पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे. २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने औद्योगिक आस्थापना, निवासी विभागातील रहिवाशांनी पुरेसा पाणी साठा करुन ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.