ठाणे – वांगणी (vangani) गावातील श्रीनगर (shrinagar) परिसरात जानकीबाई झांजे ( janukabai jhanje) या ८० वर्षांच्या दृष्टिहीन वास्तव्याला आहेत. आज सकाळी त्या घराच्या पहिल्या मजल्यावरुन थेट समोरच्या पत्र्यावर गेल्या. त्यांना नीट चालता सुद्धा येत नसल्यानं त्या बसत बसत पत्र्यावरून पुढे गेल्या. मात्र पुढे गेल्यावर त्यांना जमीन लागली नाही. त्यामुळं त्या तिथेच बसून राहिल्या आणि पत्र्याच्या टोकावर अडकून पडल्या. याचवेळी हा प्रकार शेजारी राहणाऱ्या राहुल लोते या तरुणाने पाहिला आणि त्याने तातडीने जानकीबाई यांच्या घरी धाव घेत पत्र्यावर जाऊन त्यांची सुखरूप सुटका केली. हा सगळा थरारक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरूणांने दाखवलेल्या धाडसाचं ठाण्यासह महाराष्ट्रात सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.
तरूणाचं कौतुक
वांगणी गावातील श्रीनगर परिसरात जाणुकीबाई त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. परंतु सकाळी उठल्यानंतर जागा किंवा इतर काही घेण्यासाठी निघालेल्या जाणुकाबाईंना जमीन लागली नाही कारण त्यांचा रस्ता चुकला होता. त्या जमीनीचा अंदाज घेत पुढे सरकत पण त्यांना जागा सापडली नाही. त्या पुढ सरकत असल्याचे तेथील एका तरूणाने पाहिले. त्याने तात्काळ त्यांच्या घरी धाव घेतली. तो एवढ्यावरचं न थांबता त्याने आईबाईना तिथून सुखरूप घरी नेलं त्या तरूणाचं नाव राहुल लोते असं असून त्याचं ठाण्यात आणि इतर ठिकाणी कौतुक केलं जात आहे. अनेकदा अशा घटना आपण मोबाईलमध्ये पाहतो. परंतु तरूणाने केलेल्या कार्याचं कौतुक करायला हवं, कारण अजून काहीवेळ तो जर तिथं पोहोचला नसता तर अनर्थ झाला असता असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
आज्जीबाईचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल
वांगणीत हा प्रकार घडल्यानंतर त्याचा व्हिडीओ अनेक ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे तरूणाचं सगळीकडे कौतुक करण्याच येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आजीबाई सकाळी उठल्यानंतर त्या हवी असलेली जागा शोधत असल्याने हा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडत असताना घरच्यांनी अजिबात कल्पना नव्हती. कारण घरचे सगळे झोपले असल्याची माहिती मिळत आहे. एकदा अंध व्यक्तींना अशा अडचणींना सामोरे जावे लागते. कारण प्रत्येकवेळी त्यांच्यासोबत एक घरचा माणूस असावा लागतो. आज्जीबाई सकाळी लवकर उठल्याने हा प्रकार घडला आहे.