मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात आज महाविकास आघाडीकडून कल्याणच्या शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले. , या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , व काँग्रेस चे कार्यकर्ते असल्याचे पाहायला मिळाले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलने केली जात आहेत. तर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात आज महाविकास आघाडीकडून कल्याणच्या शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.
शिवाजी चौकात ते तहसीलदार कार्यालयाला मोर्चा काढण्यात आला. नंतर तहसीलदारांना महविकास आघाडीचे नेते जगन्नाथ अप्पा शिंदे, कार्याध्यक्ष वंडार सेठ पाटील, सचिन पोटे, कांचन कुलकर्णी, अरविंद मोरे , कल्याण ग्रामीणचे पदाधिकारी शमीम शेख असेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.