कल्याण : आधी जेसीबी आणि डंपर जाळून टाकण्याची धमकी आणि नंतर कामगारांना कोंडून बेदम मारहाण (Beating) करीत रेल्वे ठेकेदाराकडून दहा लाखाची खंडणी (Ransom) मागणाऱ्या खंडणीखोरांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना अटक (Arrest) केली आहे. विजय कदम आणि यश जगताप अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. ठेकेदाराला धमकावूनही तो आरोपींकडे दुर्लक्ष होता. आरोपींच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होता. यामुळे आरोपींना ठेकेदाराच्या कामगारांना कोंडत मारहाण केली.
कल्याण पूर्व भागातील आनंदवाडी परिसरात रेल्वे यार्डात संरक्षक भिंतीचे काम रेल्वेच्या ठेकेदाराकडून सुरु आहे. काम सुरु असलेल्या ठिकाणी ठेकेदाराला धमकावत दमदाटी करुन विजय कदम याने खंडणीची मागणी केली. पहिल्या वेळी काही रुपये खंडणी घेतल्यानंतर विजय हा ठेकेदाराला वारंवार धमकावत आणखीन पैशाची मागणी करीत होता. ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने विजय कदम याने ठेकेदाराने कामासाठी आणलेले साहित्य जेसीबी मशीन जाळून खाक करण्याची धमकी दिली होती. तरी ही या धमक्यांकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले. अखेर विजय कदम याने साईटवर काम करणाऱ्या पाच कामगारांना आनंदवाडी येथील रेल्वेच्या बंद क्वार्टरमध्ये कोंडून ठेवत बेदम मारहाण केली. स्थानिकांच्या मदतीने कामगारांनी पळ काढला. ठेकेदाराच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत विजय कदम आणि यश जगताप यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.
कल्याणजवळ असलेल्या बनेली परिसरात मेडिकल चालकाने विना डॉकटर प्रिस्क्रिप्शन कोरेकस औषध देण्यास नकार दिल्याने 2 नशेखोर तरुणांनी मेडिकलची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. नशेखोर तरुणांचा हा थयथयाट सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. रात्रीच्या सुमारास हे दोन तरुण बनेली परिसरात डॉ.आंबेडकर चौक येथील वेलकम मेडिकलमध्ये आले. त्यांनी मेडिकल चालकाकडे कोरेक्स औषध मागितले. मेडिकल चालकाने डॉक्टरच्या परवानगीशिवाय हे औषध देऊ शकत नाही. डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणण्यास सांगितले. या दोन तरुणांनी पुन्हा मागणी केली मात्र मेडिकल चालकाने औषध देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या दोन्ही नशेखोर तरुणांनी मेडिकल चालकाला ठोशाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ केली. दोघे इथेच थांबले नाहीत तर मेडीकलच्या काउन्टर व दोन फ्रिज ढकलून देत तोडफोड केली. काउन्टरवरील औषधे अस्ताव्यस्त केली. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.