डोंबिवली : हॅकर्सच्या रडारवर आता बँका असून विविध ट्रिक्स वापरुन बँकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँके (Dombivli Civic Co-Operative Bank)चा सर्व्हर हॅक (Hacked) करून एका अज्ञात हॅकरने बँकेला दीड कोटीचा चुना लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी बँक प्रशासनाने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे मानपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.
डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर कोणीतरी अज्ञात इसमाने हॅक करत सर्व्हरमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत बँकेच्या डाटामध्ये फेरफार केला. बँकेची 1 कोटी 51 लाख 96 हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ठाणे नौपाडा येथील शाखेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात अचानक जास्त पैसे आल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत त्याने नौपाडा शाखेत तक्रार दिली. डोंबिवली सोनारपाडा येथील मुख्य शाखेत बँक प्रशासनाने याचा तपास केला असता तपासाअंती या बँकेचे डेटा सेंटर नवी मुंबई महापे येथे असून महापे येथून बँकेचा सर्व्हर हॅक करून एका अज्ञात हॅकरने बँकेची दीड कोटीची फसवणूक केल्याचे उघड झाले. अज्ञात हॅकर बँकेची रक्कम कमी बॅलन्स असलेल्या खात्यात वळती करत त्या खात्यातून अज्ञात खात्यात वळती केली होती. सदर बाब उघड होताच या प्रकरणी बँक प्रशासनाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मानपाडा पोलिसांनी या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत हा गुन्हा ठाणे नौपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
पुण्यातील वारजे माळवाडी भागात रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या हक्काच्या सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात या सोसायटीचे चेअरमन अंबादास गोटे आणि सेक्रेटरी गणेश माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पाच एकर जागेवर भटक्या विमुक्त समाजातील लोकं राहत होते. मात्र त्यावेळेस या लोकांची फसवणूक करत हे फ्लॅट परस्पर विक्री करण्यात आले. यामुळे या विरोधात लढा देणाऱ्या नागरिकांनी आम्हाला आमची घरं परत मिळावी अशी मागणी केली आहे. (