कल्याण डोंबिवली : डॉ विजय सूर्यवंशी आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे प्रतिपादन.... एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यलय कल्याण नागरी प्रकल्प आयोजित पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा चे उदघाटन मा आयुक्त के डी एम सी डॉ विजय सूर्यवंशी साहेब यांचे हस्ते आज स्थायी समिती सभागृहात पार पडले ..21 मार्च 2022 ते 04 एप्रिल 2022 या कालावधीत कल्याण डोंबिवली मध्ये पोषण पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे.. या वेळेस बोलताना,साहेबांनी 0 ते 6 वयोगटातील सर्व बालकांची वजन व उंची घेऊन बालकां मधील लुकडेपणा, बुटकेपणा यांची ओळख करून ते कमी करणे, बालकांमधील रक्ताक्षय कमी करणे,.तसेच गरोदर माता,स्तनदा माता,किशोरी मुली व प्रौढ स्त्रिया यामधील रक्तक्षय कमी करणे व त्यासाठी ICDS व आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम केले पाहिजे. जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी आहार,आरोग्य ,स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करून प्रत्येक लाभार्थीच्या गृहभेटी करणे व या पोषण पंधरवडा मध्ये पोषण रॅली,पोषण WALK, पोषण TALK,बाजार हाट वेबिनार, सेमिनार व विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली पाहिजे की ज्या माध्यमातून नागरिकांच्या वर्तनात बद्दल होणे आवश्यक आहे..कुपोषित समाजाकडून ,सुपोशीत समाजाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. असे त्यांनी प्रतिपादन केले.. सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी व त्यांच्या टीमचे अभिनंदन व कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यसेविका सुषमा खरात यांनी,प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील यानी व स्वागतगीत व आभारप्रदर्शन मुख्यसेविका रश्मी राऊत यांनी केले. कार्यक्रमाला के डी एम सी चे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ आश्विनी पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ पानपाटील ,महानगरपालिका सचिव संजय जाधव,प्रशासन अधिकारी राजेश तडवी ,सर्व मुख्यसेविका व कर्मचारी,अंगणवाडी सेविका व पालक उपस्थित होते.. पोषण प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली... सही पोषण!!देश रोशन!!