ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध आहे. भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेत अंतर्गत माहिती व जनसंपर्क अधिकारी पदाची १ जागा रिक्त आहे. या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २३ मार्च २०२२ पासून सुरु झाली आहे.
पदाचे नाव: माहिती व जनसंपर्क अधिकारी
एकूण पद : ०१
कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी. पत्रकारिता व जनसंपदान मधील पदवी आवश्यक.
वयोमर्यादा : ४५ वर्षे
नोकरी ठिकाण : ठाणे
वेतन श्रेणी : रु. ७०,०००/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका ठाणे, मुख्य आस्थापना विभाग, प्रशासकीय भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ४ एप्रिल २०२२
अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in