जगातील अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून ज्यांची जगात ओळख आहे. ज्यांना वाचनाची आवड होती ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले.शिका संघठीत व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र देणारे माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी रक्ताचा एक थेंब ही न सांडवता ऐतिहासिक क्रांति घडवुन आणणारे राष्ट्र निर्माते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची जयंती व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी .
या हेतूने सौ.वृषालीताई विलास शेवाळे (जि.प.सदस्य) व सौ.मोनिकाताई मुकेश गायकवाड (ग्रा.प.सदस्य म्हारळ) यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा आंबेडकरनगर व जिल्हा परिषद शाळा वंजारवाडी म्हारळ ता. कल्याण जिल्हा ठाणे या शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करून महामानवाची जयंती साजरी करण्यात आली..दोन्ही शाळेचे मुख्यशिक्षक,सहकारी शिक्षक व पालक यांनी जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून महामानवास अभिवादन केले.