पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनाही बोगस पीएचडी विकून गंडा घातल्याची धक्कदायक माहिती पुराव्यासह स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागली आहे..
पुण्यातील The Corinthians Resort and Club Pune येथे नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी या संस्थेने २१ जुलै २०२१ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी असंख्य जणांना पीएचडी पदव्या वाटण्यात आल्या.यात प्रल्हाद मोदी यांनाही बोगस पीएचडी देण्यात आली.
राजकुमार टाक, विजय पाटील, Joshua Immanuel यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो जणांना बोगस पीएचडी वाटप करणारा भामटा मधू कृष्णन हाही हजर होता. यावेळी प्रह्लाद मोदी व कृष्णन यांची भाषणेही झाली. यापुढे असाच कार्यक्रम गुजरातलाही घेवू, अशी घोषणाही आयोजकांनी केली. यावेळी प्रह्लाद मोदी यांच्यासह जमलेल्या उपस्थितांनाही THE AMERICAN UNIVERSITY, USA या बोगस विद्यापीठातर्फे बोगस पीएचडी वाटण्यात आल्या.
नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी या संस्थेचा नेल्सन मंडेला यांचा दुरान्वयेही संबंध नाही. मात्र नामसाधर्म्याचा फायदा घेऊन आतापर्यंत या संस्थेने शेकडो जणांना पीएचडी दिलेल्या आहेत. या बोगस पीएचडी घेणाऱ्यांमध्ये अशिक्षित, भाजीवाल्यांपासून ते सेलिब्रेटीजचा समावेश आहे. काही नावे स्प्राऊट्सच्या वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत.
लिएंडर पेस - टेनिसपटू, झरीन खान - अभिनेत्री, सोनू शर्मा - मोटिव्हेशनल स्पीकर, पलक मुच्छाल - पार्श्वगायक, आदित्य नारायण - अभिनेता/गायक, अनु मलिक - संगीतकार, कुमार सानू - पार्श्वगायक, संग्राम सिंग - कुस्तीपटू, उदित नारायण - पार्श्वगायक, कोबी शोशानी – कॉन्सुलेट-जनरल ऑफ इस्रायल, जॉन बार्ले - मंत्री, धनराज पिल्ले - हॉकीपटू, राजेंद्र बडवे - टाटा मेमोरियल हॉस्पिटल (संचालक), मैथिली ठाकूर - पार्श्वगायिका, फ्रान्सिस्को सार्डिन्हा - राजकारणी, फग्गन सिंग कुलस्ते - मंत्री, दिनेश कुमार जांगीड - दिल्ली कस्टम आणि जीएसटी सह आयुक्त, ज्योती कलश - नागालँडचे अतिरिक्त मुख्य सचिव, रुपेल मोहता - मॉडेल, अशोक पुरी - एमजीटी ग्रुपचे सीईओ, दुबई, हिमेश मदान - मोटिव्हेशनल स्पीकर
• ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,• अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,• कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,• युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी• अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,• झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,• सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,• महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन - (NGO)• एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट - (NGO)• नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी - NGO• डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस - NGO• मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश• मानव भारती विद्यापीठ, सोलन• विनायक मिशन्स किंवा सिंघानिया.• अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस• छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर• अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)• पीस युनिव्हर्सिटी• सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी