शिंदे गट सिंधुदुर्गात सक्रियतर किरण सामंतांची सिंधुदुर्गात दमदार एंन्ट्री सामंतांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या तर राजकीय वर्तुळात खळबळ
राणेंबरोबरील मतभेद संपले---उद्योजक किरण सामंत यांचे वक्तव्य
तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत आज पडेल देवगड,आचरा, देवबाग,कुडाळ व कणकवलीतील नागरिकांनी शिंदे गटात मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे.
तर बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्गात मजबूत करणार--- किरण सामंत
देवगड बंदर लवकरच पूर्ण होईल---किरण सामंत यांचे मच्छीमारांना आश्वासन..
किरण उर्फ भैय्या सामंत म्हणजेच नेहमीच पडद्याआड राहून सर्व राजकीय हालचाली करणारे सूत्रधार अशीच ओळख आहे.
आज मालवण तालुक्यातील आचरा येथे महेश राणेंच्या माध्यमातून आचरा येथे ५००हून अधिक महिलांनी किरण सामंतांच्या उपस्थितीत केलेला पक्ष प्रवेश हा राजकीय भुंकप ठरला आहे.
कमी बोलणे व जास्त काम करणे हे किरण सामंत स्टाईल आजच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात अनेकांनी अनुभवली आहे.*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष मजबूत होईल.पडेल देवगड,आचरा ,मालवण,कुडाळ कणकवली या ठिकाणी काही बैठका घेत कार्यकर्त्यांची संवाद साधला.
त्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. आगामी काळात आमचा पक्ष जिल्ह्यात मजबूत होईल.
मी खासदारकीचा उमेदवार नव्हे तर पक्षांनी दिलेली जबाबदारी म्हणून काम करत आहे.
आगामी काळात बाळासाहेबांच्या शिवसेना सिंधुदुर्गात मजबूत करणार असल्याची माहिती उद्योजक बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते किरण सामंत यांनी दिली.*
कणकवलीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते किरण सामंत दाखल होताच जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, माजी जि प सभापती संदेश पटेल,सुनिल पारकर,विलास साळसकर,भास्कर राणे,भूषण परुळेकर,शेखर राणे,दिलीप घाडीगावकर,दामोदर सावंत,बाळू पारकर,शैलेश सावंत आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.*
खासदारकी लढवणाऱ्या प्रश्नावर त्यांनी चेहऱ्यावर हास्य आणत आपण पक्ष मजबूत करणार आहे.दोन्ही जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी केली जाईल.
भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेतले जाणार नाहीत,जर दुसऱ्या पक्षात जात असतील तरच प्रवेश घेतले जातील.
मात्र आमच्या शिवसेनेत इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.
त्यामुळे २० ऑक्टोबरला मालवण मध्ये मोठा मेळावा घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उद्योग मंत्री उदय सामंत, ना. दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे,नामदार रविंद्र चव्हाण या सर्व नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले.
राणेंबरोबरील मतभेद संपलेउद्योजक भैय्या सामंत यांचे वक्तव्य
वाडीवरवडे,माणगाव येथील नागरिक शिंदे गटात !
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यामुळे त्यांच्या भेटीला सिंधुदुर्गातील अनेक नागरिक उपस्थित झाले आहेत.
शिंदे गट सिंधुदुर्गात सक्रिय झाला असून कुडाळ येथे उद्योजक भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे आणि माणगाव येथील नागरिक शिंदे गटात प्रवेश केला.
तर आपलीच म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही खरी आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी पूर्वी वैर नव्हते, मतभेद होते.
पण ते मतभेद दूर झालेत, असं विधान भैय्या सामंत यांनी केले आहे. यावेळी भूषण परूळेकर, वर्षा कुडाळकर,*
देवगड बंदर लवकरच पूर्ण होईल.किरण सामंत यांचे मच्छीमारांना आश्वासन..
देवगड येथील बंदर प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेमध्ये असून ते लवकरात लवकर सुरु करावे असे विविध मच्छिमारांच्या समस्यांच्या प्रश्नांचे निवेदन देवगड येथे आलेल्या उदयोजक व शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडे देवगड मच्छिमार बांधवांनी दिले आहे.
यावेळी तारामुंबरी मच्छिमारी सहकारी सोसायटी चेअरमन विनायक प्रभू,देवगड फिशरमनचे चेअरमन दिग्वीजय कोयंडे, दत्तप्रसाद भिल्लारे,उमेश आंबेरकर,उमेश खवळे,देविदास कुबल,बाबी तेली,प्रसाद कांदळगावकर,सुनिल सावंत,बाळा कोयंडे आदी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, देवगड येथे उभारण्यात आलेल्या देवगड आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम अर्धवट स्थितीमध्ये असून सदर प्रकल्पाचे काम पुन्हा चालु होऊन ते पुर्णत्वास करण्यात यावे, अर्धवट कामामुळे समुद्रामध्ये जाण्यासाठी मच्छिमारांना अडचण निर्माण होत आहे.
तसेच सदरच्या प्रकल्पामुळे मोठी आर्थीक उलाढाल देखील होणार आहे.
यामुळे सदरचा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावा.
तसेच 120 एच पी पेक्षा क्षमतेच्या इंजिन असलेल्या मासेमारी बोटींना 2022 2023 च्या डिझेल कोटयामध्ये शासनाने समावेश केलेला नाही यामुळे अश्या नौकांना बोटींना मासेमारी करता येत नाही.
तसेच मंजुर झालेला डिझेलकर परतावा या नौकांना शासन देत नाही .
तरी वरील नौकांना डिझेल कोटा मंजुर करावा व त्यांचा स्थिगित ठेवण्यात आलेला डिझेल कर परतावा त्यांना आदा करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन देवगड मच्छिमार बांधवांनी शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडे देण्यात आले.*
रत्नागिरी वैभव