प्रतिनिधी, ८ मे २०२२ :- सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललं आहे. जळगांव स्थित यावल येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शहरातील एका मुलाने लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच आरोपीने पीडिताकडून पैसे देखील उकळले. याप्रकरणी जळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल येथील विशाल राजेश तडवी या तरुणाने जळगावात महाविद्यालय शिक्षण घेत असलेल्या यावलमधील एका विद्यार्थिनीशी ओळख निर्माण केली. तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. यासाठी तरुणाने जळगाव शहरातील संभाजीनगरात भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला होता. त्यात २८ ऑक्टोबर २०१८ ते आजतागायत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्याकडे पैशाची मागणी केली.तरुणीने पैसे देण्यास नकार दिला असता तिला शिवीगाळ करून मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.