प्रतिनिधी, ११ मे २०२२ :- यवतमाळ जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील एका ३० वर्षीय विवाहित व्यक्तीने सहा वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन काही वेेळात आरोपीला जेरबंद केले आहे. या नराधमाने सहा वर्षाच्या पिडीत मुलीचे १० मे २०२२ म्हणजे मंगळवारी अपहरण केले होते. दरम्यान, आपली मुलगी कुठेही दिसत नसल्याने नातेवाईकांनी पीडितेचा शोध घेतला. मात्र, मुलगी सापडली नाही. पहाटेच्या सुमारास शेतामध्ये पीडित मुलगी आढळून आली. मुलीच्या नातेवाईकांनी मुलीला घरी नेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडित मुलीने कुटुंबियांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी मारेगाव पोलीस स्टेशन पोहोचून या प्रकरणाची तक्रार नोंदवली.