प्रतिनिधी, १२ मे २०२२ :- कल्याण पश्चिम स्थित केशाज लेडीज गारमेंट दुकानात चोरीची घटना घडली आहे. महिला चोरटयांनी दुकानात शिरत महागडे कपडे चोरुन पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून बाजारपेठ पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे. चोरीच्या घटनेची तक्रारीची नोंद बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून चोरट्यांमध्ये ५ महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. कल्याणमधील केशाज या कपड्यांच्या दुकानातून तब्बल ३२ हजारांचे कपडे चोरून महिला चोरट्यांनी पाल काढला. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.त्याच दरम्यान ७ जणांच्या टोळक्याने दुकानातील सेल्समनला कपडे दाखविण्यास सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, एक महिला कॅमरा समोर ड्रेस पाहण्याचा बहाणा करते आणि या ड्रेसच्या मागे दुसरी महिला साडीच्या आत ड्रेस भरून घेताना दिसत आहे. त्यानंतर त्या महिलेने काही क्षणातच पाच ड्रेस साडीच्या आत लपवले आणि काहीच घडले नाही, अशा अविर्भावात वावरताना सीसीटीव्हीत दिसते. या चोरी करणाऱ्या टोळीमध्ये एक महिला सराईत चोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.