Health Tips : पावसाळ्यात रोगराईची लागण होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात बऱ्याचदा प्रतिकारशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात अशा काही गोष्टी समाविष्ट करणे महत्वाचे असते ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढेल. त्याच वेळी, कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवावी लागेल. योग्यरित्या खाणं आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आहार घेणे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीर निरोगी ठेवते. व्हिटॅमिन सीसाठी कोणती फळे खावी याबद्दल जाणून घेऊया.
आंबा : आपल्या सर्वांचं आवडतं फळ आंबा प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. आंब्यातून सुमारे 122 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
पेरु : पेरु व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेलं पौष्टिक फळ आहे. पेरूमध्ये संत्रीपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. एका मध्यम पेरूमध्ये 200 ग्रॅम पौष्टिक पदार्थ असतात.
पपई : पपई पचनासाठी उत्तम फळ आहे. याशिवाय पपईमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात आढळते. पपई खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. एक कप पपईच्या ज्यूसमधून आपल्याला 88 मिलीग्राम पौष्टिक पदार्थ मिळतात.
स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीमध्येही भरपूर व्हिटॅमिन सी असते. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. या हंगामात आपल्याला स्ट्रॉबेरी मिळतात. आपण एक कप स्ट्रॉबेरी ज्यूस पिल्यास आपल्या शरीराला 100 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.
किवी : व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या किवीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. किवीमध्ये के आणि ई जीवनसत्त्वेही असतात. किवीमध्ये इतरही अनेक पौष्टिक पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.