चार वर्षांच्या वॉरंटीसह येतो ‘हा’ जबरदस्त फोन; जाणून घ्या काय आहे खास

सध्या बाजारात उपलब्ध असलेले जवळपास सर्वच फोन एका वर्षाच्या वॉरंटीसह मिळतात. परंतु एक असाही फोन आहे जो चार वर्षांच्या वॉरंटीसह मिळतोय. हा फोन Teracube नावाच्या एका अमेरिकन कंपनीनं डेव्हलप केला आहे. तसंच या फोनचं नाव Teracube 2e असं ठेवण्यात आलं आहे. या मोबाईलची किंमत केवळ ९९ डॉलर्स म्हणजेच ७ हजार २०० रूपये इतकी आहे. जाणून घेऊया काय आहे विशेष या फोनमध्ये.

Teracube 2e हा एक अँड्रॉईड स्मार्टफोन असून रिसायकल मटेरिअलपासून तयार करण्यात आला आहे. फोनमध्ये कोणत्याही गोंद वापण्यात आलेला नाही. तसंच संपूर्णरित्या स्क्रूवर हा फोन बसवण्यात आला आहे. चार वर्षांच्या वॉरंटीसह या फोनमध्ये बदलता येणारी बॅटरी आणि एक फोनची केस मिळते.

स्पेसिफिकेशनबाबत सांगायचं झालं तर या फोनमध्ये ६.१ इंचाचा वॉटरड्रॉप असलेला एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये मीडियाटेक हिलियो ए २५ प्रोसेसर देण्यात आला असून फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेलचं ड्युअल रेअर कॅमेरा सेटअपही आहे. तसंच सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त Teracube 2e मध्ये फिंगरप्रिन्ट रेन्सरही आहे. तर दुसरीकडे फेस अनलॉक, ड्युअल सीम सपोर्ट आणि एसडी कार्ड स्लॉटही देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हीसाठी ऑडिओ जॅकसह ब्लूटूथ ५.०. एनएफसी, टाईप सी पोर्ट आणि ड्युअल बँड वायफाय देण्यात आलं असून हा मोबाईल अँड्रॉईड १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनसोबक चार्चर किंवा ईयरफोन अथवा वायर देण्यात येत नाही. ग्राहकांकडे या वस्तू सहज उपलब्ध असल्यानं त्या देण्यात येत नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

ट्विन पॅकमध्ये उपलब्ध

हा क्राऊडफंडिंग प्रोडक्च असल्यामुळे याच्या दरात चढउतार हे पाहायला मिळतात. सध्या हा फोन ९९ डॉलर्सला उपलब्ध आहे. काही दिवसांनी ती वाढून ११९ डॉलर्स होऊ शकते. हा फोन ट्विन पॅकमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत १९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास १४ हजार ६०० रूपये इतकी आहे. सध्या हा फोन फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, पोलंड, सिंगापूर, स्पेन आणि युकेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Comments : 0


    No Comments

Leave a comment