घरात लहान मुल जन्माला आलं की घरातील वातावरण अगदी खुलून जातं. त्याही पेक्षा या बाळाला काय हवं काय नको ते पाहण्यामध्येच घरातील मंडळींचा अधिक वेळ जातो. मुलांच्या आहाराकडे तसेच त्यांच्या आवडी-निवडीकडे आई विशेष लक्ष तर देतेच. पण मुलांच्या त्वचेचं काय? मुलांची त्वचा ही अगदी नाजूक असते. त्यांच्या त्वचेची देखील अधिकाधिक काळजी आईला घ्यावी लागते. गरमीच्या दिवसांमध्ये तर मुलांच्या त्वचेची खूप काळजी घेणं गरजेचं असतं. फक्त उन्हाळाच नव्हे तर कोणत्याही ऋतुमध्ये मुलांची त्वचा किंवा त्यांना काही एलर्जी तर होत नाही ना याकडे लक्ष द्यावं लागतं.पण बाहेरील काही केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्ट मुलांच्या त्वचेसाठी उत्तम नसतात. याचा परिणाम मुलांच्या त्वचेवर होऊ शकतो. बाहेर उपलब्ध असणारी सनस्क्रीन तर मुलांसाठी नुकसानदायी ठरू शकते. अशावेळी तुमच्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी सनस्क्रीन तयार करू शकता. याबाबतच आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तर स्वरुपात जाणून घेऊया.