गोरेवाड्यात पहिल्याच आठवड्यात एक हजार पर्यटकांनी दिली भेट
नागपूर गोरेवाडातील बाळासाहेब आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील भारतीय सफारीला पहिल्याच आठवड्यात सुमारे एक हजार पर्यटकांनी भेट दिली, तर गोरेवाडा व्यवस्थापनाच्या तिजोरीत सुमारे अडीच लाख रुपयांची भर पडली. या उद्यानाकडे पर्यटकांचा ओढा चांगलाच वाढला असून रविवारी सफारी नोंदणी फुल्ल झाल्यामुळे पर्यटकांना निराश परतावे लागले.
या ठिकाणी २६ जानेवारीला उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी २५९ पर्यटकांनी सफारीचा आनंद घेतला आणि ६२ हजार १६० रुपयांची कमाई व्यवस्थापनाला झाली. उद्घाटनाच्या पहिल्याच रविवारी तब्बल ६२४ पर्यटकांनी भारतीय सफारीचा आनंद घेतला आणि यातून एक लाख ७८ हजार ३४० रुपये उत्पन्न मिळाले. या सफारीकरिता गोरेवाडा प्रशासनाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रविवारी ऑनलाईन ५२७ तिकीट नोंदणी झाली. तर एक लाख ६८ हजार ६४० रुपये त्यातून व्यवस्थापनाकडे जमा झाले. तर ऑफलाईन ९७ तिकीट नोंदणी झाली आणि नऊ हजार ७०० रुपये जमा झाले.
सध्या सफारीच्या वातानुकू लित प्रिमियम बसला पर्यटकांची पहिली पसंती असून रविवारी १९ फेऱ्या झाल्या. वातानुकूलित नसलेल्या बसेसच्या सहा फे ऱ्या झाल्या. सफारीच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन नोंदणीचा झालेला गोंधळ यावेळी नव्हता. त्यामुळे गोरेवाडाच्या संके तस्थळावर पर्यटक सहजरित्या भारतीय सफारीसाठी नोंदणी करत आहेत. राजकु मार नामक वाघ सध्या पर्यटकांना सहज दर्शन देत आहे. तर अस्वल सफारीत पर्यटकांना अस्वलीचे दर्शन देत आहे. मात्र गोरेवाडात सर्वाधिक संख्येत असलेला बिबट पर्यटकांना सहज दिसून येत नाही.