नव्या उड्डाणपुलाचा सामान्यांनी वापर सुरु करताच त्यावर स्टंटबाजांनी धुडघूस
नागपुरात नव्या उड्डाणपुलाचा सामान्यांनी वापर सुरु करताच त्यावर स्टंटबाजांनी धुडघूस घालण्यास सुरूवात केली आहे.ज्या दिवशी नागपूर पोलिसांचे तब्ब्ल अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची सुरक्षा करत होते. त्याच दिवशी काही टवाळखोर रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करत इतरांचे जीव धोक्यात घालत होते. नुकतंच उद्घाटन झालेल्या वांजरीनगर उड्डाणपुलाचा 26 जानेवारीच्या दुपारचा एक व्हिडियो व्हायरल झाला आणि काही धनदांडग्यांनी वंजारीनगर उड्डाणपुलावर त्या दिवशी दुपारी काय गोंधळ घातला हे सर्वांसमोर आले. विशेष म्हणजे ज्या उड्डाणपुलावर हे धुडघूस घातला त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 23 जानेवारीला केले होते.
नागपूर असो किंवा पुणे, नाशिक, मुंबई राज्यातील सर्वच मोठ्या शहरात अशा स्टंटबाजांच्या धुडघुसामुळे अनेकांचे अपघात झाले आहे. चंद्रपुरात ही नुकताच एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी अशा स्टंटबाजांविरोधात कडक कारवाई करत त्यांना धडा शिकविणे गरजेचे आहे.