नागपूर : वनखात्याची मदार खात्यातील ज्या शेवटच्या घटकावर म्हणजेच वनमजुरावर आहे, त्या वनमजुराला तक्रार नोंदवायला परिणामकारक असे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हे राज्यातील पहिले ठरले आहे. वनमजुरांपासून तर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी येथे ‘ताडोबा-संवाद अॅप’ ही भ्रमणध्वनीवर आधारित यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
प्रत्येक खात्यात कर्मचाऱ्यांना तक्रारीसाठी समितीचा वगैरे पर्याय असतो. मात्र, या कागदोपत्री यंत्रणेत शेवटपर्यंत त्या तक्रारीचे निवारण होत नाही. बरेचदा तक्रार निवारणाला उशीर होतो. ‘ताडोबा-संवाद अॅप’च्या माध्यमातून वनखात्यातील या शेवटच्या घटकाची तक्रार आता ऐकली जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून व्याघ्रप्रकल्पातील कोणताही कर्मचारी कोणत्याही वेळी त्याची तक्रार नोंदवू शकतो. ती तक्रार लगेच क्षेत्रसंचालकांनाही दिसेल. वनकर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी असेल. या सात दिवसात तक्रारीचे निवारण झाले नाही तर ती तक्रार आपोआप वरिष्ठांकडे पोहचेल. या तक्रारीला लगेच प्रत्युत्तर देता येईल. प्रत्युत्तर दिल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांनी ती तक्रार के ली त्याला त्याची सूचना मिळेल. पाच जुलैपासून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात या यंत्रणेचा वापर सुरू झाला असून आतापर्यंत दोन ते तीन कर्मचाऱ्यांनी त्याचा वापर के ला आहे. त्यांच्या तक्रारीचे निवारण देखील करण्यात आले आहे.
राज्यातील प्रत्येक व्याघ्रप्रकल्पात अशी यंत्रणा उभारल्यास व्याघ्रप्रकल्पासाठी ते फायद्याचे ठरणार आहे. वनखात्यासाठी काम करणाऱ्या स्पर्श टेक्नॉलॉजी या कंपनीने ही यंत्रणा तयार के ली आहे. याच कं पनीने ई-ऑक्शनसाठी देखील खात्याला यंत्रणा तयार करुन दिली आहे.
सायंकाळी क्षेत्रीय कार्यालयात तक्रार आली असेल तर ती कळण्यास बराच वेळ लागतो. परिणामी, तिचे निवारणही लांबणीवर पडते. त्यामुळेच आम्ही भ्रमणध्वनीवर आधारित ‘ताडोबा-संवाद अॅप’ ही यंत्रणा विकसित के ली आहे. त्वरित संवादाचे ते उत्कृ ष्ट माध्यम ठरेल अशी अपेक्षा आहे. -डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प.