दिल्लीच्या श्रद्धा अफ्ताब प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत या एकूणच प्रकरणाकडे सोशल मीडियावर लव जीहाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे सामान्य व्यक्ती ते सेलिब्रेटिंग पासून यावर कित्येक लोक व्यक्त होत आहेत मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांनी या कृत्याचा निषेध केला आहे त्याचबरोबर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील याविषयी खेद व्यक्त केला आहे. वसईच्या एका 26 वर्ष तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची 35 तुकडे केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, सोशल मीडियावर चांगलीच खळबळ मजली आहे. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते तब्बल सहा महिन्यानंतर हे कौर्य उघडकिस आला आहे. पोलीस चौकशीत या सगळ्या भय्यावह गुन्ह्याची तिच्या प्रियकराने कबुली दिली आहे.घरच्यांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने श्रद्धा वालकर ही आफताब पुणेकर याच्यासोबत घर सोडून दिल्लीत राहायला गेली. या प्रकरणाकडे पाहता फेसबुकवरील एका युजरची पोस्ट शेअर करत शरद पौशे यांनी याबद्दल खेद व्यक्त केला आहे. "कधी येणार अक्कल प्रेमाची व्याख्या बदलत चालली आहे. आई-वडिलांनी खूप सांगून सुद्धा न ऐकल्याचा इतका भयंकर परिणाम असू शकतो हे श्रद्धाला कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत कळलं ही नसेल. मुलींनी जागरूक व्हायला हवं" असा एक सल्लाच त्यांनी ही पोस्ट शेअर करताना दिला आहे. त्यांच्या या पोस्टवरही कित्येक लोकांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. तर काही महिला युजर्सनी तर जरा नाही, जास्तच जागरूक व्हायची गरज आहे. असं कॉमेंट मध्ये लिहिल आहे. या प्रकरणात न्यायव्यवस्था अफ्ताबला काय शिक्षा देणाऱ याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
१. प्रकरणाकडे सोशल मीडियावर लव जीहाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे २. मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांनी या कृत्याचा निषेध केला आहे३. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील याविषयी खेद व्यक्त केला आहे.४. मुलींनी जागरूक व्हायला हवं"- शरद पोंक्षे